¡Sorpréndeme!

राहुल गांधी कामात सोनिया गांधी गोव्यात | Latest Political News Update | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

नवीन वर्षाचे स्वागत गोव्यात राहून करण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला असून, सुटीसाठी त्या गोव्यात दाखलही झाल्या आहेत.अभिनेता रितेश देशमुख याने सोनिया गांधींचा एका फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. रितेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनिया गांधी सायकल वर फेरी मारत असून, काही पर्यटक त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्यात मग्न आहेत. सोनियांच्याचेहऱ्यावर  स्मितहास्य असून, त्या निश्चिंत दिसत आहेत. मिळालेल्या माहिती नुसार सोनिया गांधी ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबरला गोव्यात दाखल झाल्या आहेत.राहुल गांधी यांनी प्रत्यक्षपणे पक्षाची सूत्रे १६ डिसेंबर रोजी स्वीकराली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राहुलच पक्षातील निर्णय घेत होते, असे सोनिया गांधी यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. पक्षाचे अध्यक्षपद जवळपास १९ वर्षे सांभाळल्यानंतर सोनिया गांधी पहिल्यांदाच अशा सुटीवर गेल्याचे दिसत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews